September 9, 2025 5:09 am

Breaking News
‘लक्ष्मी निवास’ आधी प्रसाद-अमृताने ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलेलं एकत्र काम, १० वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर सिराजचा जादुई चेंडू अन् भारताचा इंग्लंडवर विजय, युवा टीम इंडियाचं बोल्ड सेलिब्रेशन; सामन्यातील अखेरच्या क्षणाचा VIDEO गुजरात: भावनगरमध्ये सिंहाने आपला शिकार खाल्ल्याची नोंद करण्याचा प्रयत्न एका माणसाने केला, व्हिडिओ पहा आमदाराचा पुतण्या असल्याचे सांगून ‘नो एन्ट्री’तून जाण्यासाठी पोलिसांना शिवीगाळ दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांना ७५ लाखांची नुकसान भरपाई ५ ऑगस्ट राशीभविष्य मेष, मिथुन, धनु, कुंभ राशीच्या लोकांना पुत्रदा एकादशी ज्योतिषशास्त्रानुसार भरपूर पैसा मिळेल, यशस्वी करिअर वाढ होईल.

Home » मुखपृष्ठ » ‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांचे अमरावतीशी नाते काय? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने..

‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांचे अमरावतीशी नाते काय? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने..

Spread the love

अमरावती : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने ‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे अमरावती जिल्ह्याशी अत्यंत जवळचे नाते आहे. अमरावती जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव हे ८०० लोकवस्तीचे खेडे म्हणजे भीमराव पांचाळे यांचे गाव. आई आणि वडिलांकडून तुकडोजी महाराजांची भजने आणि पारंपरिक ओव्या ऐकल्या होत्या. वडील भजन गायला खांद्यावर बसवून घेऊन जायचे. सातवीत गेल्यावर वडिलांनी अमरावतीला शिकायला पाठवले. भीमराव यांचे गाणे ऐकून कुणी तरी त्यांनी गाणे शिकावे, असे सुचवले आणि त्यातून शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण झाले.

त्यांनी आपल्या गायनाने राज्यभर आणि देशभर खूप मान मिळवला. त्यांच्या कलेला मिळालेली हवी असलेली प्रतिष्ठा आणि त्यांचे गझल गायनाच्या क्षेत्रातील योगदान हे आजच्या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणारे ठरले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या काव्याचा प्रभाव त्यांच्यावर शाळकरी वयातच झाला. त्यांच्यामुळेच पांचाळे मराठी गझलेकडे वळले. ‘जगत मी आलो असा की…’ही भटांची त्यांनी गायलेली अन् संगीतबद्ध केलेली पहिली गझल. सुरुवातीच्या काळात पु. ल. देशपांडे यांच्याकडून भरभरून कौतुक वाट्याला आले, त्यांनी एनसीपीएला कार्यक्रमही घडवून आणला. पुढे स्टेट बँकेत नोकरी लागली. आर्थिक स्थैर्य आले, पण नोकरीचे बंधन होते. पत्नी पाठीशी उभी राहिली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते गझलेसाठी मुक्त झाले. रेल्वेने प्रवास करीत त्यांनी कानाकोपऱ्यातील मराठी माणसापर्यंत गझल पोहोचवली.

Facebook
X
WhatsApp

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers

Are You Satisfied Dabangnama Xpress

‘लक्ष्मी निवास’ आधी प्रसाद-अमृताने ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलेलं एकत्र काम, १० वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर

Spread the love

Spread the lovePrasad Jawade And Amruta Deshmukh : अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. प्रसाद ‘पारू’ मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर अमृता नाटक, मालिकांमध्ये काम करत असते. आता हे दोघे ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’च्या महासंगमनिमित्त एकत्र काम करणार आहेत. अशातच या जोडीने यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कधी एकत्र