Mohammed Siraj Magical Ball Clean Bowled Gus Atkinson: मोहम्मद सिराजच्या ५ विकेट्सच्या जोरावर भारताने ओव्हलमध्ये थरारक विजय मिळवला आहे. ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय संघाने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली आणि इंग्लंडला धावा काढण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. इंग्लंडला विजयासाठी ६ धावांची गरज असताना सिराजने त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गस एटकिन्सनला क्लीन बोल्ड करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यानंतर सिराजने त्याचं खास सेलिब्रेशन करत आनंद साजरा केला. संपूर्ण भारतीय संघाने एकच जल्लोष करत विजयाचं सेलिब्रेशन केलं.
भारताने पाचव्या दिवसाच्या पहिल्याच षटकात इंग्लंडने दोन चौकार लगावले, पण त्यानंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंड संघाची झोप उडवली. दोघांनीही मिळून झटपट ३ विकेट्स घेतले आणि इंग्लंडला ६ धावांची गरज असताना सिराजने एटकिन्सनला क्लीन बोल्ड केलं आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
सिराज-प्रसिधच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडने गुडघे टेकले
मोहम्मद सिराजने पाचव्या दिवसाच्या त्याच्या स्पेलमधील पहिल्याच षटकात जेमी स्मिथला माघारी धाडलं. स्मिथची विकेट घेण्यासाठी ध्रुव जुरेलने कमालीचा चेंडू टिपला. यानंतर सिराजने त्याच्या पुढच्या षटकात जेमी ओव्हरटनला पायचीत करत भारताला आठवी विकेट मिळवून दिली. यानंतर प्रसिधने टंगला बोल्ड केलं.