Asaduddin Owaisi Praise For Mohammed Siraj Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने थरारक विजय मिळवला आहे. ओव्हलच्या मैदानावर मिळालेला हा विजय आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घेतलेले पाच विकेट्स यावरवर हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अस्सल हैदराबादी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
त्यांनी मूळचा हैदराबादचा असलेल्या मोहम्मद सिराजचे अभिनंदन करताना एक्सवर खास पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “नेहमीच एक विजेता, मोहम्मद सिराज ! जसे आपण हैदराबादीमध्ये म्हणतो, पुरा खोल दिए पाशा!”
मोहम्मद सिराजने या कसोटी मालिकेत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये २३ बळी घेतले आहेत. त्याच्या या जबरदस्त कामगिरीनंतर त्याला अखेरच्या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. ओवैसी हे सिराजचे चांगलेच चाहते राहिले आहेत, यापूर्वीही त्यांनी त्याचे अनेकदा कौतुक केले आहे.