
सिंधुदुर्ग कसाल येथे भरधाव कार अपघातात महिलेचा मृत्यू
सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, तिचे अपंग पती, चार महिन्यांची मुलगी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावले. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली. शमिका शशांक पवार (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती




