
‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांचे अमरावतीशी नाते काय? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने..
अमरावती : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने ‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे अमरावती जिल्ह्याशी अत्यंत जवळचे नाते आहे. अमरावती जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी